Monday, September 4, 2017

पायाभूत चाचणी विशेष...

💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎

📌संदर्भ-१४ जुलै २०१७ चा शासन निर्णय📌

             मित्रांनो या शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे. या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल.
👇👇👇👇👇👇👇👇
   
🔵 प्रगत विद्यार्थी व्याख्या :- प्रत्येक विषयांसाठी विषयाच्या एकुण गुणांच्या किमान 60 % गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे आणि त्या विषयांतील प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत गणला जाईल.

     वरील व्याख्येनुसार प्रगत विद्यार्थी ठरवण्यासाठी प्रत्येक इयत्तावाईज व विषयावाईज किमान किती गुण हवे आहेत त्याची विभागणी खालीलप्रमाणे देता येईल.

     🔹 इयत्ता 2री 🔹    

प्रत्येक विषयांत किमान गुण 18 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.
                 
  🔸 इयत्ता 3री व 4थी🔸
     
प्रत्येक विषयांत किमान गुण 24 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

   🔹 इयत्ता 5वी व 6वी🔹

प्रत्येक विषयांत किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

  🔸इयत्ता 7वी व 8वी🔸

प्रत्येक विषयांत किमान गुण 36 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

🔵 वर्गात अप्रगत विद्यार्थी आढळून आल्यास त्याबद्दल पुढे काय कार्यवाही करावी लागेल?

➡ वर्गातील अशा अप्रगत मुलांची विषयानिहाय यादी करून या मुलांना त्या त्या क्षमतेमध्ये प्रगत होण्यासाठी शिक्षकाने विशेष मदत करायची आहे आणि ती मुले प्रगत होईपर्यंत अशा मुलांची दर महिन्याला चाचणी घ्यावयाची आहे.जो जो विद्यार्थी प्रगत होत जाईल त्या त्या विद्यार्थ्याची चाचणी घेणे बंद करावयाचे आहे.

💎💎💎💎💎💎💎💎💎💎

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...        
💎💎💎💎💎💎💎💎

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ              
💎  १९ ते २४    -   ब
💎  १३ ते १८    -   क
💎   ०  ते १२      -  ड
                       
        श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ
🚩   ३१ ते ४०   -     ब
🚩   २१ ते ३०    -   क
🚩   ० ते २०     -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

💎💎💎💎💎💎💎

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%


-------------------------------------------------------------------

Sunday, August 13, 2017


१) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.
२) आपले राष्ट्रीय सण कोणते?
➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.
३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
➡सामर्थ्याचे
४) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
➡सत्यमेव जयते.
५) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
➡सारनाथ-अशोकस्तंभ.
६) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡२४
७) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡तिरंगा
८) भारताचे ध्वजगीत कोणते?
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.
९) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)
१०) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)
११) भारत देश कोणत्या खंडात आहे?
➡आशिया
१२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
➡- चार -निळा ,         केशरी,पांढरा,हिरवा.
१३) राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
➡ समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक.
१४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
➡शांततेचा
१५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
➡समृद्धीचे प्रत
१६) राजमुद्रा कशावर असते?
➡सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.
१७) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
➡१९५०
१८) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
➡अक्षरधाम मंदीर
१९) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
➡देवनागरी
२०) प्रजासत्ताक म्हणजे काय?
➡प्रजेची सत्ता
२१) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?
➡+९१
२२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२३) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद
२४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
➡रुपया.
२५)भारताचे राष्ट्रहित कोणते?
➡अहिंसा
२६)लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
➡दुसरा
२७)भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या
➡भारतीय संगीत ,कर्नाटकी संगीत
२८)भारताची राजधानी कोणती?
➡नवी दिल्ली
२९)भारताचे प्रवेशद्वार कोणते?
➡गेट वे ऑफ इंडिया
३०)भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
➡शेती
३१)भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
➡२२
३२)स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
➡लॉर्ड माउंटबॅटन
३३)भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?*➡हॉकि
३४)नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?*
➡रविंद्रनाथ टागोर
३५)भारताचे राष्ट्रीय फुल?
➡कमळ
३६)राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?
➡सावधान स्थितीत
३७)भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?
➡१९४७
३८)भारताची राजभाषा कोणती?
➡मराठी
३९)भारताची राष्ट्रभाषा कोणती?
➡हिंदी
४०)भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
➡वंदे मातरम
४१)भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
➡राकेश शर्मा
४२)अवकाशयात्री पहिली महिला कोण?
➡कल्पना चावला
४३)पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡ऐश्वर्या रॉय
४४)भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
➡सौ.प्रतिभाताई पाटील
४५)महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
➡९.७ %
४६)भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
➡२६ नोव्हेंबर १९४९
४७)राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
➡सत्यमेव जयते
४८)राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
➡सूर्यास्ताच्या वेळी
४९)भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
➡आंबा
५०)२६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡राष्ट्रपती
--------------------------

Tuesday, August 1, 2017

सरल महत्वाचे..

सरल स्टाफ पोर्टल मधील Basic Details मधील चुकलेल्या तारखा दुरुस्तीबद्दल..


             ज्या शिक्षकांच्या सध्याच्या व्यवस्थापनाची,पदाची, जिल्ह्याची,तालुक्याची,शाळेची रुजू तारीख चुकलेली आहे अशा शिक्षकांना या तारखा दुरुस्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या लॉगिन मधून शिक्षणाधिकारी लॉगिन ला आपल्या तारखा या दुरुस्तीसाठी पाठवतील त्यानंतरच शिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून सदर अचूक तारखा दुरुस्त करू शकतील.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना खात्रीपूर्वक तपासून घेऊनच दुरुस्त कराव्यात.कोणत्याही शिक्षकांना आपल्या या सर्व तारखा दुरुस्त करण्याची एकच संधी देण्यात आलेली आहे.एकदा आपली माहिती दुरुस्त झाली की त्यानंतर भविष्यात पुन्हा या तारखा दुरुस्तीसाठी देण्यात येणार नाही.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना काळजी घ्यावी.कारण आपल्या लॉगिन मधून देखील चुका झाल्या तरी देखील पुन्हा  या तारखामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मा.संचालक श्री मगर साहेब यांनी दिलेल्या आहेत.सदर तारखा दुरुस्त करण्यासाठी ही सुविधा दिनांक १४/०८/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.जिल्हा अंतर्गत बदली प्रोसेस मध्ये या सर्व तारखा अचूक असणे खूप महत्वाचे आहे या दृष्टीने ही सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे सध्या संवर्ग-१,२ व ३ या संवर्गातील शिक्षक बदली फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने या शिक्षणाच्या तारखात प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी.त्यानंतरच इतर शिक्षकांच्या तारखा दुरुस्त कराव्यात. आपण जिल्हाअंतर्गत बदलीचा या आधीच फॉर्म भरलेला असेल तरी देखील या तारखा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी व पुढील काळात विविध कामासाठी सदर प्रिंट आपणाकडे जपून ठेवावी.याचा अर्थ असा घेऊ नये की,यासाठी ट्रान्सफर पोर्टल चे लॉगिन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.आपण स्टाफ पोर्टल मधून या तारखा दुरुस्त केल्यावर ट्रान्सफर पोर्टल मधून फक्त प्रिंट काढून घेण्याची सुविधा सुरु असणार आहे याची नोंद घ्यावी.

         चुकलेल्या तारखा कशा दुरुस्त कराव्या यासाठीचे मॅन्युअल Download  करण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा.

आदरणीय प्रदीप भोसले सर यांच्या सौजन्याने....