Tuesday, August 1, 2017

सरल महत्वाचे..

सरल स्टाफ पोर्टल मधील Basic Details मधील चुकलेल्या तारखा दुरुस्तीबद्दल..


             ज्या शिक्षकांच्या सध्याच्या व्यवस्थापनाची,पदाची, जिल्ह्याची,तालुक्याची,शाळेची रुजू तारीख चुकलेली आहे अशा शिक्षकांना या तारखा दुरुस्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या लॉगिन मधून शिक्षणाधिकारी लॉगिन ला आपल्या तारखा या दुरुस्तीसाठी पाठवतील त्यानंतरच शिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून सदर अचूक तारखा दुरुस्त करू शकतील.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना खात्रीपूर्वक तपासून घेऊनच दुरुस्त कराव्यात.कोणत्याही शिक्षकांना आपल्या या सर्व तारखा दुरुस्त करण्याची एकच संधी देण्यात आलेली आहे.एकदा आपली माहिती दुरुस्त झाली की त्यानंतर भविष्यात पुन्हा या तारखा दुरुस्तीसाठी देण्यात येणार नाही.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना काळजी घ्यावी.कारण आपल्या लॉगिन मधून देखील चुका झाल्या तरी देखील पुन्हा  या तारखामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मा.संचालक श्री मगर साहेब यांनी दिलेल्या आहेत.सदर तारखा दुरुस्त करण्यासाठी ही सुविधा दिनांक १४/०८/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.जिल्हा अंतर्गत बदली प्रोसेस मध्ये या सर्व तारखा अचूक असणे खूप महत्वाचे आहे या दृष्टीने ही सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे सध्या संवर्ग-१,२ व ३ या संवर्गातील शिक्षक बदली फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने या शिक्षणाच्या तारखात प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी.त्यानंतरच इतर शिक्षकांच्या तारखा दुरुस्त कराव्यात. आपण जिल्हाअंतर्गत बदलीचा या आधीच फॉर्म भरलेला असेल तरी देखील या तारखा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी व पुढील काळात विविध कामासाठी सदर प्रिंट आपणाकडे जपून ठेवावी.याचा अर्थ असा घेऊ नये की,यासाठी ट्रान्सफर पोर्टल चे लॉगिन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.आपण स्टाफ पोर्टल मधून या तारखा दुरुस्त केल्यावर ट्रान्सफर पोर्टल मधून फक्त प्रिंट काढून घेण्याची सुविधा सुरु असणार आहे याची नोंद घ्यावी.

         चुकलेल्या तारखा कशा दुरुस्त कराव्या यासाठीचे मॅन्युअल Download  करण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा.

आदरणीय प्रदीप भोसले सर यांच्या सौजन्याने....
             

No comments:

Post a Comment