Monday, September 4, 2017

पायाभूत चाचणी विशेष...

💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎

📌संदर्भ-१४ जुलै २०१७ चा शासन निर्णय📌

             मित्रांनो या शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे. या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल.
👇👇👇👇👇👇👇👇
   
🔵 प्रगत विद्यार्थी व्याख्या :- प्रत्येक विषयांसाठी विषयाच्या एकुण गुणांच्या किमान 60 % गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे आणि त्या विषयांतील प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत गणला जाईल.

     वरील व्याख्येनुसार प्रगत विद्यार्थी ठरवण्यासाठी प्रत्येक इयत्तावाईज व विषयावाईज किमान किती गुण हवे आहेत त्याची विभागणी खालीलप्रमाणे देता येईल.

     🔹 इयत्ता 2री 🔹    

प्रत्येक विषयांत किमान गुण 18 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.
                 
  🔸 इयत्ता 3री व 4थी🔸
     
प्रत्येक विषयांत किमान गुण 24 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

   🔹 इयत्ता 5वी व 6वी🔹

प्रत्येक विषयांत किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

  🔸इयत्ता 7वी व 8वी🔸

प्रत्येक विषयांत किमान गुण 36 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.

🔵 वर्गात अप्रगत विद्यार्थी आढळून आल्यास त्याबद्दल पुढे काय कार्यवाही करावी लागेल?

➡ वर्गातील अशा अप्रगत मुलांची विषयानिहाय यादी करून या मुलांना त्या त्या क्षमतेमध्ये प्रगत होण्यासाठी शिक्षकाने विशेष मदत करायची आहे आणि ती मुले प्रगत होईपर्यंत अशा मुलांची दर महिन्याला चाचणी घ्यावयाची आहे.जो जो विद्यार्थी प्रगत होत जाईल त्या त्या विद्यार्थ्याची चाचणी घेणे बंद करावयाचे आहे.

💎💎💎💎💎💎💎💎💎💎

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...        
💎💎💎💎💎💎💎💎

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ              
💎  १९ ते २४    -   ब
💎  १३ ते १८    -   क
💎   ०  ते १२      -  ड
                       
        श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ
🚩   ३१ ते ४०   -     ब
🚩   २१ ते ३०    -   क
🚩   ० ते २०     -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

💎💎💎💎💎💎💎

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%


-------------------------------------------------------------------

1 comment:

  1. 1xbet korean online casino - legalbet.co.kr
    1xbet korean online casino 1xbet korean - legalbet.co.kr - deccasino Review for online 샌즈카지노 casino - Legalbet.co.kr - Get your free bonus now!

    ReplyDelete